Vidhan Sabha Adhiveshan: NCP Protest

Posted by Sangram Jagtap on September 12, 2015 at 1:20 AM

पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी देखील विरोधकांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची आपली मागणी आक्रमकपणे लावून धरली. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी व गिरणी कामगारांसाठी हक्काचे घर या मुद्द्यांवर विरोधक ठाम राहिले. या विषयांकडे सरकारकडून विशेष दखल न घेतली गेल्याने विरोधकांनी सभात्याग केला. आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी विरोधी पक्षांतील नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली. यानंतर विरोधकांच्या निदर्शनांनी वारकऱ्यांच्या दींडीचे स्वरूप घेतले व गळ्यात टाळ अडकवून कीर्तनाच्या स्वरूपात घोषणाबाजी सुरू झाली.अनोख्या घोषणा देत विरोधकांकडून सरकारचा निषेध करण्यात आला.

 पार्टीचे सर्व आमदारांसमवेत संग्राम अरुणकाका जगताप' टाळ वाजवत या दिंडीत सामील झाले होते.


Categories: None