view:  full / summary

MLA Sangram Jagtap : Collector Office Movement

Posted by Sangram Jagtap on September 12, 2015 at 1:25 AM

"जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा"

सोमवार दिनांक २४ ऑगस्ट २०१५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आमदार संग्राम अरुणकाका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढण्यात आला.

 

अहमदनगर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, ग्रामीण भागात आणि शहराच्या ठिकाणी छावण्या व चारा डेपो सुरु करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने व आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.


Vidhan Sabha Adhiveshan: NCP Protest

Posted by Sangram Jagtap on September 12, 2015 at 1:20 AM

पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी देखील विरोधकांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची आपली मागणी आक्रमकपणे लावून धरली. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी व गिरणी कामगारांसाठी हक्काचे घर या मुद्द्यांवर विरोधक ठाम राहिले. या विषयांकडे सरकारकडून विशेष दखल न घेतली गेल्याने विरोधकांनी सभात्याग केला. आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी विरोधी पक्षांतील नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली. यानंतर विरोधकांच्या निदर्शनांनी वारकऱ्यांच्या दींडीचे स्वरूप घेतले व गळ्यात टाळ अडकवून कीर्तनाच्या स्वरूपात घोषणाबाजी सुरू झाली.अनोख्या घोषणा देत विरोधकांकडून सरकारचा निषेध करण्यात आला.

 पार्टीचे सर्व आमदारांसमवेत संग्राम अरुणकाका जगताप' टाळ वाजवत या दिंडीत सामील झाले होते.Rss_feed